धकधक गर्ल माधुरीने शेयर केली ही गोड आठवण, बहिणीसोबतचा फोटो केला पोस्ट 

By  
on  

लॉकडाउनमध्ये घरात बसून एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळतेय ती म्हणजे लोकं त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. जुने फोटो पाहून त्या गोड आठवणी पुन्हा जागवत  आहेत. हे चित्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतय. विशेषकरून कला विश्वातील कलाकार या जुन्या आठवणींमध्ये रमत आहेत. सोशल मिडीयावर कलाकार त्यांचे जुने फोटो पोस्ट करून त्या फोटोतली खास आठवण शेयर करत आहेत. 

सुपरस्टार माधुरी दीक्षितनेही तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. माधुरीला लहानपणापासून नृत्याची आवड आहे. लहानपणी बहिणीसोबत नृत्य स्पर्धेत भाग घेत असल्याची एक आठवण माधुरीने शेयर करत तिचा बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, “ही माझी सगळ्यात आवडती आठवण आहे माझ्या बहिणीसोबतची. आम्ही शाळेतल्या नृत्य स्पर्धेत नेहमी सहभाग घ्यायचो. माझी आवडती डान्स पार्टनरसोबतची ही खास आठवण मी शेयर करतेय. मला सांगा तुमची लहानपणीची आवडती आठवण कोणती ते.”
माधुरीचा लहानपणीचा हा फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मिडीयावर या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Recommended

Loading...
Share