By  
on  

ईदसाठी युपीला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीची Corona Virus टेस्ट निगेटिव्ह

करोनाचा प्रभाव सगळीकडे आहे. करोना रुग्णांची संख्या असलेले हॉटस्पॉट जवळपास लॉकडाऊनमध्ये आहेत. या दरम्यान ईदसाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईहून उत्तर प्रदेशमधील बुढाना या गावी पोहोचला आहे. यानंतर कुटुंबासह जवळपास 14 दिवस तो क्वारंटाईन झाला आहे. तिथे पोहोचल्यावर नवाजुद्दीनने करोना टेस्टही केली होती. जी निगेटिव्ह आहे. यावेळी नवाजुद्दीन लॉकडाऊनमध्ये परवानगी घेऊन मुळ गावी गेला होता. 

 

काही दिवसांपुर्वी नवाजुद्दीन तबलिगींच्या मकरजच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता. त्यावेळी त्याने विधान केलं होतं की सरकारने याचं पालन करायला सांगितलं आहे तर करायलाच हवं. नवाजुद्दीन आगामी ‘घुमकेतू’या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात अनुराग कश्यप, ईला अरुण, रघुबीर यादव, स्वानंद किरकिरे आणि रागिनी खन्ना हे कलाकार असणर आहेत. हा सिनेमा 22 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive