By  
on  

पाहा Motion Logo: बिग बी आणि आयुष्मान खुरानाची फिल्म ‘गुलाबो सिताबो’च्या मेकर्सनी प्रदर्शित केला सिनेमाचा मोशन लोगो

शूजित सरकारच्या दिग्दर्शनात बनलेली बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा सिनेमा 'गुलाबो सिताबो'चा मोशन लोगो नुकताच प्रदर्शित झाला आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमासाठी बरीच उत्सुकता होती आणि लॉकडाउनमुळे आता या सिनेमाच्या मेकर्सनी हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. 12 जून पासून अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळेल. या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळतील. हा सिनेमा याच वर्षी 17 एप्रिल रोजी  प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना व्हायरसचा सुळसुळाट आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाउन या कारणाने हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.

 मात्र आता इतकी वाट पाहिल्यानंतर अखेर हा सिनेमा डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन लोगोने या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता वाढवली आहे.
आयुष्मान आणि बिग बींनीही हा मोशन पोस्टर शेयर केला आहे.  “होशियारी और चालाकी की एक प्राईजलेस जोडी” असं म्हणत आयुष्यमानने हा मोशन लोगो शेयर केला आहे.

 

तर बिग बी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, “असं म्हणतात की जोड्या वरून बनून येतात. मात्र ही प्राईजलेस जोडी मेड ईन लॉक़डाउन आहे.”

 

हा सिनेमा आता सिनेमागृहात पाहता येणार नसला तरी डिजीटल प्लॅटफॉर्मवरही बिग बींसारखे महानायक आणि एक उत्तम अभिनेता आयुष्मान खुराना यांना एकत्र पाहण्याची मजा वेगळीच असेल एवढं नक्की.

Recommended

PeepingMoon Exclusive