महानायक बिग बींसोबतचा फोटो शेअर करत आयुष्मान खुराना म्हणतो....

By  
on  

हरहुन्नरी आणि चाकोरीबाह्य सिनेमांसाटी प्रसिध्द असलेला तरुणाईचा लाडका अभिनेता आयुष्मान खुराना लवकरच बिग बींसोबतच्या गुलाबो सिताबो या धम्माल विनोदी सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतोय. आयुष्मानसारख्या हुशार अभिनेत्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळतेय. हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. अशातच आपला हा आनंद सर्वांसोबत शेअर करताना आयुष्मानने खास पोस्ट केली आहे. 

आयुष्मान म्हणतो, " माझ्या शेजारी जी व्यक्ती बसली आहे, तो या दशकाचा महानायक आहे. नशीब त्याने वेषांतर केलंय, नाहीतर माझी काय मजाल होती की मी त्यांच्यासमोर I Dont care वाला expression देऊ. तसंही #GulaboSitabo चा ट्रेलर लवकरच येतोय."

 

या सिनेमात बिग बी चक्क  एका जर्जर झालेल्या  म्हाता-याची भूमिका साकारतायत. अभिनेता आयुष्मान खुरानासुध्दा बिग बींसोबत ह्या सिनेमात झळकतोय. प्रसिध्द दिग्दर्शक शूजित सरकार यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  

'गुलाबो सीताबो' चा येत्या १२ जून रोजी  Amazon Prime Video वर वर्ल्ड प्रिमियर होणार आहे

 

 

Recommended

Loading...
Share