अनुष्का-विराटच्या घरात डायनॉसॉर , नागपूर पोलिसांनी दाखवली रेस्क्यू टीम पाठवण्याची तयारी

By  
on  

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल सोशल मिडीयावर सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वीच अनुष्का घरी बसून विराटची मजा घेताना पाहायला मिळाली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. विराट चक्क डायनॉसॉरखा घरात इथून-तिथे फिरत होता व चक्क त्याच्यासारखा आवाजही काढत होता....आणि त्याची बायको अनुष्का तो व्हिडीओ शूट करत त्याची गंमत करत बसली होती. शूट करुनच ती थांबली नाही तर तिने तो व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअरही केला. 

मग काय सोशल मिडीयावर व्हायरल होणा-या या व्हिडीओवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव तर केलाच पण भन्नाट प्रतिक्रिया पण दिल्या. नागपूर पोलिसांची नुकतीच नजर या व्हिडीओवर पडली आणि त्यांनी  डायनॉसॉरला पकडण्यासाठी वन विभागातर्फे रेस्क्यू टीम पाठवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे आता त्यांच्या या प्रतिक्रिने एकच हशा पिकला व सध्य परिस्थितीतील गंभीर वातावरण थोडंसं का होईना सोशल मिडीयावर तरी हलकं-फुलकं झालं. 

Recommended

Loading...
Share