By  
on  

अभिनेता किरण कुमार यांना Corona Virus ची लागण, स्वत: केला खुलासा

जगभरात करोनाने हाहाकार उडवला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. बॉलिवूडमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. आता अभिनेता किरण कुमार यांनाही करोनाचं संक्रमण झाल्याचं समोर येत आहे. किरण कुमार यांनी यापुर्वी 10 दिवस स्वत:ला क्वारंटाईन करून ठेवलं होतं.

 

किरण कुमार बांद्र्याला राहतात. त्यांनी स्वत: करोना संक्रमण झाल्याची माहिती दिली आहे. किरण म्हणतात, ‘काही प्राथमिक तपासण्यासाठी मला ज्यावेळी दवाखान्यात जावं लागलं त्यावेळी संक्रमण झाल्याचं समोर आलं.’ ‘ते पुढे म्हणतात, ‘मला करोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. सर्दी, ताप, खोकला काहीही नव्हतं. तरीही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.’ किरण यांनी आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज्येष्ठ अभिनेता जीवन कुमार किरण यांचे वडीत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive