By  
on  

‘Boss lady’ कंगनाचं ऑफिस पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

लॉकडाऊनमध्ये कंगना राणावत मनाली येथील घरी आहे. याच दरम्यान मुंबईमधील पाली इथं असलेल्या कंगनाच्या ऑफिसचे काही फोटो समोर आले आहेत. जानेवारीमध्ये कंगनाने तिचं प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स आणि नव्या ऑफिसचं उद्घाटन केलं होतं. 

ऑफिसच्या इंटेरिअरमध्ये कंगनाने शक्यतो हाताने बनवलेल्या वस्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला आहे. या इंटेरिअरसाठी जवळपास 48 कोटींचा खर्च आला आहे. मॅगझीन एली डेकोरच्या फीचरमध्ये कंगनाने सांगितलं की, ‘1920च्या काळाची आठवण करून देणारं काहीसं हवं आहे. त्यावेळी इंटेरिअरचा मोठा हिस्सा सिल्क असायचं. 

कंगना म्हणते, गेले काही वर्षं मी इकोलॉजिकल फुटप्रिंटसाठी जागरुक आहे. तुम्ही पाहू शकता. ऑफिस प्लॅस्टीकमुक्त आहे. याशिवाय ऑफिसमध्ये हिरवळही आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive