पाहा Photos : 'कँडल' गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी लॉस एंजेलिसच्या या स्टुडिओमध्ये गेली होती धकधक गर्ल माधुरी

By  
on  

सुपरस्टार माधुरी दीक्षित नेने हे नाव आता संगीत क्षेत्रातही सहभागी झालय. लॉकडाउनच्या काळात घरातूनच केलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये माधुरीने गाणं गायलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. माधुरीची ही कला सगळ्यांनाच पाहायला मिळाली. त्यानंतर काही दिवसातच माधुरीचं पहिलं डेब्यू गाणं रिलीज झालं. सध्याच्या कोरोनाच्या सुळसुळाटाना निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत माधुरीचं गाणं प्रेरणादायी ठरणारं कँडलं हे गाणं माधुरी घेऊन आली. 

लॉकडाउनच्या आधी हे गाणं माधुरीने लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं. या स्टुडिओमध्ये मायकल जॅक्सनसारख्या मोठ्या कलाकारांनी गाणी रेकॉर्ड केल्याचं माधुरी एका मुलाखतीत म्हटली होती.. आणि याच स्टुडिओमधील गाण्याच्या  रेकॉर्डिंगच्या फोटो स्वरुपातील आठवणी माधुरीने शेयर केल्या आहेत. सोशल मिडीयावर माधुरीने तिचे रेकॉर्डिंगचे फोटो पोस्ट केले आहेत. 
या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, “लॉस एंजेलिसच्या स्टुडिओमधील काही खास क्षण जिथे आम्ही कॅंडल गाणं रेकॉर्ड केलं. हा खूप अप्रतिम प्रवास होता आणि यात काही मैत्रीही झाल्या. मोठा शाउटआउट माझ्या टीमसाठी ज्यांनी  माझं संगीताविषयीचं प्रेम माझ्या आयुष्यात सत्यात उतरवण्यासाठी मदत केली”


या गाण्याचं रेकॉर्डिंग जरी लॉकडाउनच्या आधी झालं असलं तरी याचं चित्रीकरण मात्र माधुरीने लॉकडाउनच्या काळात घरातच केलेलं आहे.  
 

Recommended

Loading...
Share