By  
on  

गायक, चित्रकार बनल्यानंतर सलमान बनणार लेखक? सुरु आहे ही तयारी

करोनामुळे जग घरात बंद असलं तरी सलमान मात्र अनेक क्रिएटिव्ह आयडिया घेऊन प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. या लॉकडाऊनमधे सलमानने 'प्यार करोना', 'तेरे बिना' आणि 'भाई भाई' ही गाणी गायली. पण आता सलमानच्या मनात लेखक बनायचं आहे. लॉकडाऊनमध्ये सलमानने लिहायला सुरुवात केली आहे. या लॉकडाऊनमध्ये सलमान एका लव्हस्टोरीची स्क्रिप्ट लिहित आहे.

 

एक फ्रेश लव्हस्टोरी लिहिणं सलमानच्या मनात आहे. सलमानने याचा पहिला ड्राफ्ट तयार केला आहे. यावर्षाखेरीस सलमान ही गोष्टपुर्ण करणार असल्याचं समजत आहे. करोनाच्या साथी दरम्यान सलमान सामजिक कार्यातही अग्रेसर आहे. सिनेसृष्टीतील बॅकस्टेज आर्टिस्टना आर्थिक मदत करण्यापासून ते पोलिसांना सॅनिटायझर देण्यापर्यंत सलमानने हात पुढे केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive