By  
on  

जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत अक्षयचं स्थान अबाधितच

प्रतिष्ठीत फोर्ब्ज मॅग्झीनने नुकतीच सर्वाधिक मानधन घेणा-या तारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय आहे. प्रसाधन विश्वाची महाराणी केली जेन्नर ही या यादीत टॉपवर आहे. 
अक्षयने 48.3 दशलक्ष इतकी कमाई करून या यादीत स्थान मिळवलं आहे.

 

अक्षयसोबत या यादीत कॉनर मॅकग्रेगॉर, लेडी गागा, केटी पेरी, अ‍ॅजेलिना जोली, जेनिफर लोपेज, विल स्मिथ, रिहाना हे सेलिब्रिटीदेखील यादीत स्थान राखून आहेत. ‘फोर्ब्स’ने जाहिर केलेल्या यादीमध्ये अक्षय कुमार ५२व्या स्थानावर आहे.  या यादीत देसी गर्लचा पती निक जोनासही आहे. 

अक्षयच्या या प्रगतीमागे गुड न्युज, केसरी, हाऊसफुल 4 आणि मिशन मंगलच्या दैदिप्यमान यशाचाही हात आहे. अक्षय सामाजिक कार्यातही सतत अग्रेसर असतो. आगामी तो सुर्यवंशी सिनेमातून समोर येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive