By  
on  

कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी प्रसिध्द गायकांची ऑनलाईन कॉन्सर्ट

जग ‘कोविड -१९’ महामारीशी लढत असताना ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ (सीपीएए) या कर्करोग रुग्णांसाठी गेली पाच दशके काम करत असलेल्या संस्थेने  आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी एका अनोख्या अशा ऑनलाईन सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘येस टू लाईफ...नो टू टोबॅको’ नावाचा हा कार्यक्रम ७ जून २०२० रोजी सायंकाळी ८ वाजता जागतिक तंबाखूरहित सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये आघाडीचे गायक सहभागी होत असून त्यांत शान, कुणाल गांजावाला, सलीम सुलेमान, नेहा भसीन आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ‘कोविड -१९’ महामारीच्या परिस्थितीत कर्करोगावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी करण्यात आले आहे.  

या जाहीर कार्याक्रमातून जो निधी जमा होणार आहे तो ‘कोविड-१९’ लॉकडाउनच्या काळात जे कर्करोग रुग्ण त्यांच्या उपचारांसाठी मुंबईत आले पण येथेच अडकून पडले अशा गरीब रुग्णांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. ‘सीपीएए’ त्यांना महिनाभर लागणारे अन्नधान्य पुरवीत असून त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या निवारा सोयींबद्दलची माहिती देते आणि त्यांन स्वच्छता उपकरणे पुरविते. त्यांमध्ये मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा समावेश असतो.

त्याशिवाय या रुग्णांना कार्कारोगाबाद्द्लची जागरुकता, व्यवस्थापन व उपचार यांमध्येही संस्थेतर्फे मदत केली जाते. ‘सीपीएए’ने जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ)च्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रख्यात गायक शान, कुणाल गांजावाला, सलीम मर्चंट, बेनी दयाळ, शादाब फारिदी, नेहा भसीन, ध्वनी भानुशाली, जोनिता गांधी, शिल्पा राव, अदिती सिंग, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, अनुषा मणी, ममता शर्मा आणि रसिका आदी सहभागी होणार आहेत. त्याशिवाय इतर मान्यवरसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल.  ‘टीकटॉक इंडिया’च्या अधिकृत हँडलवरून त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे कारण १५० मिनिटांचा हा विनाखंड करमणूक आणि माहिती कार्यक्रम हा सर्वात विश्वसनीय अशा संस्थांनी आयोजित केलेला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि ‘कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन’ या संस्थांचे हे आयोजन आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive