By  
on  

दीपिका कुणाला म्हणतीये ‘The greatest off-screen hero’ जाणून घ्या

दीपिकाचे वडील आणि प्रसिद्ध बॅटमिंटन प्लेअर प्रकाश पदुकोण यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यावेळी दीपिकाने खुप गोड मेसेज करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका वडिलांच्या मांडीवर बसली आहे. यावेळी पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये दीपिका म्हणते,’ सगळ्यात महान ऑफस्क्रीन हिरोसाठी. खरं यश म्हणजे केवळ जिंकणं नाही तर उत्तम व्यक्ती बनणं हे आहे हे आम्हाला शिकवल्याबद्दल धन्यवाद.

 

 

65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आमचं सगळ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. पिंक स्वेटर आणि ब्लू जीन्समधली दीपिका यावेळी खुप क्युट दिसत आहे. प्रकाश पदुकोण यांना भारत सरकारने 1982 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. दीपिका लवकरच ‘83’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive