By  
on  

या दोन बॉलिवुड कलाकारांनी ट्विटरला केलं राम राम, हे आहे कारण

अभिनेता साकिब सलीम आणि अभिनेत्री सोनाली सिन्हा यांनी त्यांचं ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. याविषयीची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील शेवटच्या पोस्टने आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टने दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aag lage basti mein... mein apni masti mein! Bye Twitter

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करुन लिहीलं आहे की  “आग लगे बस्ती में, मैं अपनी मस्ती में'. 
शिवाय ती पुढे लिहीते की, “आपल्या मानसिक आरोग्याचं संरक्षण करण्याचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नकारात्मकतेपासून दूर राहा आणि यावेळी ट्विटरवर सध्या खूप नकारात्मकता आहे. मी माझं अकाउंट डीएक्टिवेट करत आहे. बाय मित्रांनो.”

तर दुसरीकडे साकिबने त्याचं शेवटचं ट्विट करून लिहीलं की, “ट्विटर, जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होते तेव्हा तू चांगला होता. भावना व्यक्त करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म होतास. मात्र नंतर असं झालं की इथे गैरवर्तन करणं ही सामान्य गोष्ट झाली. मागील काही दिवस मला विचार करणं भाग पडलं, की मला अशा पद्धतिची ऊर्जा माझ्या आयुष्यात नकोय. माझ्या 99 हजार फॉलोवर्सना धन्यवाद. आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जोडले जाऊ. मात्र आता माझं आणि ट्विटरचं हे नातं खूप झालं. तुझा एक्ल लव्हर.”
असं म्हणत साकिबने ट्विटरलाच ही पोस्ट लिहीली. 
 सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडीयावर नेपोटीझम आणि बऱ्याच विविध मुद्द्यांवर चर्चा होऊ लागल्या आहेत. शिवाय ट्विटरवर सध्या विविध विषयांवर विविध नकारात्मक चर्चा होऊ लागल्या आहेत. या विविध कलाकारांच्या प्रोफाईलवर आणि त्यांच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आणि यामुळेच या दोन कलाकारांनी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आलय. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक शशांक खेताननेही ट्विटर सोडलं होतं. 

Recommended

PeepingMoon Exclusive