करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला . यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. अनेक दिवसांपासून आपले लाडके सेलिब्रिटी हे घरातूनच एड फिल्म्सचं शूटींग करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात आता सलमाननंतर शाहरुख खानही चाहत्यांसाठी एक सरप्राईज घेऊन येत असल्याचं दिसतंय.
ब-याच दिवसांपासून सोशल मिडीयावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो आपल्या मन्नत बंगल्याच्या बाल्कनीत उभा राहून शूटींग करताना दिसतोय. तसंच यावेळी मोठमोठे कॅमेरेसुध्दा त्याच्या गॅलरीत ठेवले होते.
King Khan spotted at his balcony!
Any guesses what's happening? @iamsrk#ShahRukhKhan pic.twitter.com/WYdS5zkJql— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) June 26, 2020
शाहरुखने बाल्कनीतून आपले हात उंचावत आणि सिग्नेचर पोझ देऊन चाहत्यांना खुश केलं आणि चाहतेसुध्दा मग सैराट झाले. त्याचं कुठलं आगामी प्रोजेक्ट आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण त्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
२०१८ साली झिरो हा शाहरुख खानचा शेवटचा सिनेमा होता.