By  
on  

Boycott Netflix: भगवान कृष्णाचं नाव वापरल्याने नेटकरी खवळले, केली ही मागणी

अलीकडे लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होताना दिसत आहेत. कृष्णा अॅण्ड हिज लीला नावाचा दाक्षिणात्य सिनेमा नुकताच सोशल मिडियावर रिलीज झाला आहे. यामध्ये मुख्य भूमिकेचे नाव कृष्णा असून त्याने अनेक मुलींशी संबंध असल्याचं दाखवलं आहे. त्यापैकी राधा, सत्या आणि रुक्सार या तीन पात्रांशी त्याचे जवळचे संबध दाखवले आहेत. 

 

 

हे पाहून नेटिझन्स भडकले आहेत. हिंदू धर्मातील देवांची नावे प्रमुख भूमिकांना देऊन निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचं ट्वीट अनेकजण करत आहेत. त्यातूनच #Boycottnetflix हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.  देवांना का मध्ये आणता अशी विचारणा नेटिझन्सनी नेटफ्लिक्सला केली आहे. तर नेटफ्लिक्स हिंदूफोबिक असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive