By  
on  

विद्युत जामवाल, कुणाल खेमूनंतर अहाना कुमरानेही ओटीटी प्लॅटफॉर्म विरोधात मत नोंदवलं

डिस्ने हॉटस्टारने अलीकडेच 9 मोठे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली. यावेळी अक्षयचा लक्ष्मीबाँब, अजयचा भूज: द प्राईड ऑफ इंडिया, महेश भट्ट यांचा सडक 2 आणि अभिषेक बच्चनचा द बिग बुल हे दिसणार आहेत. याशिवाय सुशांत सिंग राजपुतचा ‘दिल बेचारा’ क्रिती सॅनॉनचा मिमि, सनी कौशल आणि राधिका मदानचा शिद्दत, कुणाल खेमूचा लूटकेस आणि विद्युत जामवालचा खुदा हाफिज हे सिनेमे  हॉट स्टार वर रिलीज होतील.

 

 

यावेळी झालेल्या व्हर्च्युअल इव्हेंट मध्ये केवळ अक्षय, अजय, आलिया आणि अभिषेक बच्चन यांनाच आमंत्रण होतं. कुणाल खेमू, विद्युत जामवाल यांना या इव्हेंटला बोलावलं नाही.यावेळी विद्युत जामवाल आणि अहाना कुमरा यांनी याबाबत नाराजी नोंदवली आहे. अहाना म्हणते, ‘ मला या प्रेस कॉन्फरन्सबाबत विद्युतकडून कळालं. याचं उत्तर मागून मिळणार नाही याची खात्री होती. ओटीटी प्लॅटफॉर्मकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. यावेळी विद्युत म्हणतो, ‘इंडस्ट्रीने स्वत:च्या पायावर उभं असलेल्या कलाकारांचा सन्मान करायला हवा.’ ते या सन्मानाच्या लायक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive