सरोजजींच्या निधनानं इंडस्ट्रीचं कधीही भरुन न निघणारं नुकसान : अक्षय कुमार

By  
on  

बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणा-या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीवर खुप मोठी शोककळा पसरलीय. एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला. असं म्हणत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने दु:ख व्यक्त केलं आहे.

अक्षय ट्विटद्वारे सरोज खान यांना श्रध्दांजली वाहताना म्हणतो, “महान कोरिओग्राफर सरोज खान यांच निधन झालं. एका वाईट बातमीनं आजचा दिवस सुरु झाला आहे. त्या डान्स इतक्या सोप्या पद्धतीने शिकवायच्या की डान्स करु शकेल. बॉलिवूडसाठी हा एक झटका आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” 

 

मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी सरोज खान यांनी बहादार नृत्यदिग्दर्शन  केलं आहे. 

Recommended

Loading...
Share