सुशांत सिंग राजपुतला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट ठरली सरोज खान यांची शेवटची पोस्ट

By  
on  

हे वर्षं बॉलिवूडसाठी वेदनादायी ठरलं आहे. इरफान खान , ऋषी कपूर, सुशांत सिंग राजपुत, साजिद खान आणि आता सरोज खान हे कलाकार जग सोडून गेले. सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूचा धक्का ओसरतो न ओसरतो तोच सरोज खान यांच्या निधनाची बातमी आली. विशेष म्हणजे सरोज यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सुशांत सिंग राजपुतला श्रद्धांजली वाहणारी होती.

 

 

त्या आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये सुशांतबाबत लिहिलं होतं की, ‘ मी तुझ्यासोबत कधी काम केलं नाही सुशांत पण आपण खुप वेळा भेटलो आहे. तुला अशी कोणती समस्या होती की तू हे पाऊल उचललंस. या बातमीमुळे मी खुप अस्वस्थ आहे. तू वडिलधा-यांशी बोलायला हवं होतंस. कदाचित त्यामुळे तुझा निर्णय बदलू शकला असता. तुझ्या कुटुंबियांवर काय आघात झाला असेल याची कल्पना करणं केवळ अशक्य आहे. तुझ्या सगळ्या सिनेमांवर खुप प्रेम केलं आहे. नेहमीच करत राहू’.

Recommended

Loading...
Share