बॉलिवुडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अखरेचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरची प्रतिक्षा अखेर संपली. आज मेकर्सनी हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सुशांतच्या आठवणीत रममाण झालेल्या चाहत्यांसाठी ह्यापेक्षा आनंदाची दुसरी बाब असूच शकत नाही. इतके दिवस ते त्याचे जुने व्हिडीओ, फोटो यांमधून त्याच्या आठवणींना उजाळा देत होते. आता त्याच्या या नव्या आणि शेवटच्या सिनेमाची भेट त्यांना मिळेल. हा ट्रेलर पाहणा-याच्या डोळ्यात पाणी आणतो. येत्या २६ जुलै रोजी डिस्नी हॉटस्टारवर हा सिनेमा प्रेक्षकांना जगभर पाहता येणार आहे.
द फॉल्ट इन अवर स्टार्स या सिनेमाचा दिल बेचारा हा हिंदी रिमेक आहे. यात सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनेत्री संजना सांघीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. एका कॅन्सर झालेल्या तरुणीची कथा आणि तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा तिचा मित्र असं सिनेमाचं कथानक आहे. किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच चढ-उतार पाहायाला मिळणार आहेत.
ए. आर. रेहमान यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. तर सोशल मीडियावर ह्या ट्रेलरच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
पाहा ट्रेलर
जगण्याची नवी उमेद आणि नवी आशा देणा-या सिनेमासोबतच चाहत्यांना एक सत्य मात्र स्विकारावंच लागेल, ते म्हणजे यानंतर सुशांतचा कुठलाच सिनेमा त्यांच्या भेटीला येणार नाही.