By  
on  

पाहा Video : रणवीर सिंह आणि अमृता सुभाषची अशी आहे मैत्री, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

'गलीबॉय' सिनेमावर अवॉर्ड्सचा वर्षाव झाला होता. रणवीर सिंहसह या सिनेमातील इतर कलाकारांच्या अभिनयाचही कौतुक झालं होतं आणि त्यांनाही फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं होतं. याच सिनेमात रणवीर सिंहच्या मुराद या पात्राच्या आईच्या भूमिकेत होती अभिनेत्री अमृता सुभाष. अमृतालाही या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून मागील वर्षीच्या फिल्मफेयर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

 

मात्र रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्ताने एकीकडे सोशल मिडीयावर सगळीकडे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. त्यातच त्याची ऑनस्क्रिन आई आणि ऑफस्क्रिन मैत्रीण अमृता सुभाषनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2019च्या फिल्मफेयर सोहळ्यातील काही क्षणचित्र तिने पोस्ट केली आहेत. यात एक व्हिडीओही आहे ज्यात अमृता आणि रणवीर एकमेकांना भेटताना दिसत आहेत. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive