By  
on  

सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा'चा ट्रेलर पाहून सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांचा जीव झाला वेडापिसा

बॉलिवूडचा  हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आता नुकताच सुशांतचा अखरेचा ठरलेला चित्रपट दिल बेचारा याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा सिनेमा सुशांतच्या जाण्याने आणखीनच भावूक करणारा ठरतोय.  विेशेष म्हणजे या ट्रेलरला कमी कालावधीत सर्वाधिक व्ह्युज मिळाले आहेत.त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर ट्रेण्ड होत आहे. इतकंच नाही तर हा ट्रेलर पाहण्याची विनंतीदेखील त्याचे चाहते करत असल्याचं दिसून येत आहे. त्यांमुळे अनेकांनी काही मीम्स शेअर करत हा ट्रेलर नक्की पहा असं म्हटलं आहे. तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा सुशांतचा हा ट्रेलर शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive