सुशांत सिंग राजपुतच्या अकाली जाण्यानंतर आठवणींच्या माध्यमातून तो आपल्यात आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्या शेवटच्या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आता जगात नसलेल्या सुशांतला स्क्रीनवर पाहणं थोडफार दु:खदायकही आहे.
#DilBechara ️️
Its gonna be really hard to watch this one.. but how can i not? #Sushant @CastingChhabra @sanjanasanghi96 #SushantSinghRajput
Trailer : https://t.co/xPbMXO9YcG— Kriti Sanon (@kritisanon) July 6, 2020
अनेका सेलिब्रिटीही सुशांतच्या या सिनेमाला स्वत: प्रमोट करताना दिसत आहेत. कृती सेनॉनने मात्र या दरम्यान हटके पोस्ट केली आहे. कृतीने हा ट्रेलर ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘मला हे पाहणं खुप दु:खदायक आहे. पण मी हे पाहणारच’. येत्या 24 जुलै पासून डिझ्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा पाहता येणार आहे.