By  
on  

साउथ टीव्ही स्टार सुशील गौडाची आत्महत्या, वयाच्या 30व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

2020 हे वर्ष कधी सरतय असच सगळ्यांना वाटतय. या वर्षी विविध दुखद बातम्यांना सामोरं जावं लागत आहे. यावर्षी मनोरंजन विश्वातील नामवंत कलाकारांना या वर्षी आपण गमावलय. यातच आता साउथ अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या करून त्याचं जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे. मांड्या येथील गावी त्याने आत्महत्या केली आहे. मात्र या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या निधनाने त्याचे मित्रपरिवार, कुटुंब आणि टेलिव्हीजन क्षेत्रातील त्याच्या हितचिंतकांना धक्का बसला आहे.

 सुशील गौड  हा अवघ्या 30 वर्षांचा होता. रोमँटिक टिव्ही शो ‘अन्तापुरा’ मधील अभिनयासाठी त्याची ओळख होती. अभिनयासोबत सुशील हा फिटनेस ट्रेनरदेखील होता.
 मात्र सुशीलने इतका मोठा निर्णय का घेतला याविषयी कोणतीच माहिती समोर आलेली नाही. आता पोलीस सध्या या गोष्टीचा तपास घेत आहेत.
 

Recommended

PeepingMoon Exclusive