अनुपम खेर यांच्या आईसोबतच या कुटुंबियांनाही Covid-19 ची लागण
करोनाचं लोण आता बॉलिवूडमध्ये चांगलंच पसरताना दिसत आहे. अमिताभ आणि अभिषेकनंतर आता आणखी एका सेलिब्रिटीच्या कुटुंबावर करोनाचं संकट आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांची आई, भाऊ, भावजय आणि पुतणी यांना करोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. यासोबतच अनुपम खेर आणि पुतण्या प्रणित याचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अनुपम यांच्या आईला कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
तर भाऊ राजू यांच्या कुटुंबाने स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. त्यांचं घराच लवकरच नगरपालिकेकडून सॅनिटायझेशन केलं जाणार आहे. याशिवाय अनुपम यांनी आई-वडिलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. यासोबत परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उपाययोजना करण्यास सुचवलं आहे.