By  
on  

चार स्टाफ मेंबर Covid-19 पॉझिटिव्ह आल्याने दिग्दर्शक जोया अख्तरचा बंगलाही सील

करोनाच्या केसेस वाढताना दिसत आहे. सामान्य व्यक्तीपासूनते सेलिब्रिटीपर्यंत कोणीही करोनाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांचे कुटुंबियही या करोनाच्या तडाख्यात सापडले आहेत. अलीकडेच रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डची टेस्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. या यादीत आता आणखी एक सेलिब्रिटी आहे. दिग्दर्शक जोया अख्तर हिचा बंगलाही बीएमसीने सील केला आहे.

 

जोयाच्या घरचे चार स्टाफ मेंबर Covid-19 पॉझिटिव्ह आल्याने बीएमसीने हा बंगला सील केला आहे. जोयाचा बंगला रेखाच्या बंगल्याच्या अगदी शेजारी आहे. गेल्या 10 दिवसात जोयाच्या घरी कोण कोण आलं गेलं यांची आणि जोयाची करोना टेस्ट केली जाणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive