By  
on  

या मराठी अभिनेत्रीला अभिनयाची संधी मिळाली होती गोविंदामुळे

स्वत:च्या खास अभिनय शैली आणि नृत्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. गोविंदाने एक खास किस्सा शेअर केला आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्याबाबत एक किस्सा शेअर केला आहे. सोनालीला पहिला ब्रेक गोविंदाने मिळवून दिला होता असं त्याने एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. सोनाली सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करत होती.

अशा वेळी तिची भेट गोविंदाशी झाली. यावेळी गोविंदानेच तिला अभिनयात करीअर करण्याचा सल्ला दिला होता. सोनाली या क्षेत्रात आल्यानंतर ‘जिस देस मे गंगा रहता है’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. गोविंदाच्या खुलाशाने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive