By  
on  

Video : म्हणून अनुपम खेर यांनी आपल्या आईला करोना झाल्याचं सांगितलं नाही

बॉलिवूडकरही या करोना संकटापासून सामान्यांसारखेच झुंज देत आहेत. सध्या बच्चन आणि खेर कुटुंबियांना करोनाची लागण झाल्याने दोन्ही कुटुंब प्रचंड काळजी घेत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. परिणामी त्यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु या प्रकरणातील एक खास बाब म्हणजे अनुपम खेर यांच्या आईला त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही, याबाबत खुद्द अनुपम खेर यांनीच एका व्हिडीओद्वारे माहिती दिली. 

अनुपम खेर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर करत म्हणतात, “माझा भाऊ, वहिनी आणि पुतणी यांना देखील करोनाची लागण झाली. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरु आहेत. परिणामी ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. परंतु या वातावरणात मला आईची फार काळजी वाटतेय. कारण रुग्णालयात उपचार घेताना देखील ती शांत राहात नाही. ती सतत आमची चिंता करत असते. त्यामुळे आम्ही आईला तिला करोना झाल्याचं सांगितलेलं नाही. तिला फक्त इन्फेक्शन झाल्याचंच सांगितलंय.  पण आसपासचं वातावरण पाहून कदाचित  तिला कळतंय की ती इथे का आली आहे.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive