By  
on  

अभिषेक बच्चनची ‘लूडो’ पासून जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ पर्यंत, नेटफ्लिक्स ने अनाउंस केल्या 17 ओरिजीनल फिल्म्स आणि सिरीज

नेटफ्लिक्सने आज ओटीटीवरील प्रेक्षकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. नेटफ्लिक्सने चक्क 17 ओरिजीनल स्टोरीज आज रिव्हील केल्या आहेत. ज्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आगामी काळात प्रदर्शित होतील. थ्रिलर ते रोमँटिक कॉमेडी आणि ड्रामा हे जॉनर यात असतील. ज्यात 6 नवीन सिनेमे आणि 2 नवीन सिरीजचाही समावेश आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Are you excited or ARE YOU EXCITED?!

A post shared by Netflix India (@netflix_in) on

 
अ सुटेबरल बॉय (सिरीज) 
मिरा नायर दिग्दर्शित या सिरीजमध्ये इशान खट्टर, तब्बू, तान्या मानिकताला, रसिका दुग्गल, शहाना गोस्वी, राम मिखेल सेन, दानेश राझ्वी, नमीत दास हे कलाकार असतील.

 एके वर्सेस एके (फिल्म)
विक्रमादित्य मोतवाने दिग्दर्शित या सिनेमात अनील कपूर आणि अनुराग कश्यप झळकतील. या सिनेमात अनुराग आणि अनील हे त्यांच्या नावाच्या आणि तोच प्रोफेशन असललेल्या भूमिका साकारतील.

भाग बिनी भाग (सिरीज)
या सिरीजमध्ये स्वरा भास्कर, रवी पटेल, डॉली सिंह, वरुण ठाकुर, मोना आंबेगावकर आणि गिरीश कुलकर्णी अशी कास्ट असेल. देबी राव, अबी वर्घेसे आणि इशान नायर यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.

बॉम्बे बेगम्स (सिरीज)
अलंक्रिता श्रीवास्तवा आणि बोर्निला चॅटर्जी यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. या सिरीजमध्ये पूजा भट, शहाना गोस्वामी, अमृता सुभाष, प्लबिता बोरठाकुर, आध्या आनंद ही कास्ट झळकेल.

 बॉम्बे रोझ (फिल्म)
गितांजली राव यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. 

क्लास ऑफ 83 (फिल्म)
अतुल सब्रवाल दिग्दर्शित या सिनेमात बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे.


 
डॉली किटी और वो चमकते सितारे (फिल्म)
या सिनेमात भूमी पेडणेकर, कोंकणा सेनशर्मा, विक्रांत मेस्सी, अमोल पराशर, आमीर बशीर महत्त्वाच्या भूमिका साकरत आहेत.

 गिन्नी वेड्स सनी (फिल्म)
या सिनेमात यामी गौतम आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत.

गुंजन सक्सेना – द कारगील गर्ल (फिल्म)
 महिला एअर फोर्स ऑफिसर गुंजन सक्सेनावर आधारित या सिनेमात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे.  

 काली खुही(फिल्म)
तेरी समुद्रा दिग्दर्शित या सिनेमात शबाना आझमी, सत्यदीप मिश्रा, संजीदा शेख, रिवा अरोरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. 

 लूडो (फिल्म)
अनुराग बासूच्या या सिनेमात अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, पर्ल मानी, पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. 

 मसाबा मसाबा (सिरीज)
सोनम नायरच्या या सिरीजमध्ये मुली आईची जोडी म्हणजेच मसाबा गुप्ता आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत असतील.

मिसमॅच (सिरीज)
युट्यूब स्टार प्राजक्ता कोळी आणि रोहीत सराफ या सिरीजमध्ये झळकतील.

रात अकेली है (फिल्म)
या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दगी, राधीका आपटे, आदित्य श्रीवास्तवा, इला अरूण, तिगमांशू धुलिया, श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, खालिद त्याबी, शिवानी रघुबंशी अशी स्टारकास्ट असेल. 


 

सिरीयस मेन (फिल्म) 
सुधीर मिश्राच्या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दकी, अक्षथ दास, श्वेता बासू प्रसाद, नसर अशी स्टारकास्ट असेल.


 

तोरबाज (फिल्म)
या सिनेमा संजय दत्त मुख्य भूमिकेत असेल. गिरीश मलिकच्या या सिनेमा नरगीस फाकरी आणि राहुल देव देखील झळकतील.

त्रिभंगा – तेढी मेढी (फिल्म)
रेणुका शहाणे दिग्दर्शित या सिनेमात काजोल, तन्वी आझमी आणि मिथीला पालकर अशी कास्ट झळकणार आहे. 

 हे 17 फिल्म आणि सिरीजने भरपुर असलेलं मनोरंजन लवकरच नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होईल.
 

Recommended

PeepingMoon Exclusive