By  
on  

ठरलं तर ! 'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' ह्या दिवशी नेटफ्लिक्सवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जान्हवी कपूर आपल्या आगामी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'  या सिनेमासाठी बरीच उत्सुक होती. हा सिनेमा २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण लॉकडाऊनमुळे सर्वच फिस्कटलं. पण यापूर्वीच  पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीचा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन रसिकांच्या भेटीला येण्याची दाट शक्यता होती. अखेर या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'  हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रसिकांच्या भेटीला येत आहे. भारताच्या लढाऊ विमानाची माजी फायटर पायलट गुंजन सक्सेनाची व्यक्तिरेखा जान्हवी सिनेमात साकारते आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आणि झी स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे.

 

 

मागच्या वर्षी 'गुंजन सक्सेना'चं शूटींग लखनौमध्ये सुरु झालं होतं. शरण शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पंकज त्रिपाठी यांनी गुंजनच्या वडिलांची तर अंगद बेदीने गुंजनच्या भावाची व्यक्तिरेखा सिनेमात साकारली आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive