By  
on  

Exclusive: संजय गुप्तांच्या ‘रक्षक’मध्ये जॉन अब्राहम साकारणार दक्ष पोलिस अधिकारी

दिग्दर्शक संजय गुप्ता लॉकडाऊनचा उपयोग अत्यंत सकारात्मक पद्धतीने करून घेत आहेत. मुंबई सागानंतर आता आणखी एका शुटआऊट सिरीजच्या पटकथेवर त्यांनी नुकताच हात फिरवला आहे. याशिवाय त्यांच्या सुपरहिरो प्रोजेक्टचं सुतोवाचही झालं आहे. ‘रक्षक’ या सुपरहिरो सिनेमात जॉन अब्राहम चमकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडचा हंक जॉन अब्राहमचं नाव या सिनेमासाठी संजय यांनी नक्की केलं आहे. संजय यांच्या मल्टीस्टारर गॅंगस्टर ड्रामामध्ये काम करत असतानाच जॉनने या सिनेमासाठीही होकार कळवला आहे.  शमिक दासगुप्ता यांच्या ‘रक्षक: अ हिरो विदिन अस’ या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. अन्यायाविरुद्ध लढणा-या हिरोची गोष्ट यात आहे.

या भूमिकेसाठी जॉन हा एकच पर्याय संजय यांच्याजवळ होता. सध्या या पटकथेवर अखेरचा हात फिरवणं सुरु आहे. या वर्षाखेरीस सिनेमा फ्लोअर वर जाईल. कॅप्टन आदित्य शेरगिल यांच्या संघर्षावर ही कादंबरी आधारित आहे. अन्यायविरुद्ध लढणा-या योद्ध्याची गोष्ट यात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive