By  
on  

सलमानच्या 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई'चा यंदा दिवाळीचा मुहूर्तसुध्दा चुकणार ?

सलमान खान आणि  दिशा पाटनीचा सिनेमा 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' च्या शूटींग संदर्भातील अनेक बातम्या सतत झळकत आहेत. या सिनेमाचं १० ते १२ दिवसांचं शूटींग रखडलं आहे. ते मुंबईतील एका स्टुडिओत होणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या करोना संदर्भातील विविध अपडेट्समुळे आणि आरोग्याच्यादृष्टीने मुंबतईतील गर्दीच्या ठिकाणांचं हे शूटींग आता रद्द करण्यात आलं आहे.

एका आघाडीच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भाईजान हा या महिन्या अखेरीस मुंबईत येणार होता आणि ऑगस्टपासून राधेच्या उर्वरीत शूटींगचा श्रीगणेशा करणार होता. सलमान अद्यापही आपल्या पनवेलच्या फार्नहाऊसवरच लॉकडाऊन काळ घालवतोय. त्याच्या मते करोनाच्या वाढत्या केसेस पाहून सध्या तरी शूटींग सुरु करणं ही एक रिस्कच आहे. यासंदर्भात अतुल अग्निहोत्री, सोहेल खान आणि निखिल नमित या सिनेमाच्या निर्माते आणि इतर टीम मेंबर्ससोबत सलमानने चर्चा केली. यात पावसात आऊटडोअर शूटींग आणि करोनाचा कहर यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत तरी शूटींग नकोच असा निर्णय घेण्यात आला आहे. 

या सर्वांमुळे दिवाळीपर्यंत तरी राधेचं शूटींग पूर्ण होईल असं काही वाटत नाही. त्यामुळे पोस्ट प्रोडक्शन व इतर कामांमुळे आता हा सिनेमा पुढच्या वर्षीच म्हणजेच २०२१ मध्ये रसिकांच्या भेटीला येईल. 'राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई' या आगामी सिनेमात भाईजान अंडरवर्ल्डच्या डॉनची भूमिका साकारतोय. तर प्रभूदेवाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली ाहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive