By  
on  

जॉन अब्राहम स्टारर ‘मुंबई सागा’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याची सुरु आहे तयारी?

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शनापुर्वीपासूनच चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.  ‘मुंबई सागा’ या सिनेमाच्या रिलीजची चाहते वाट पाहात आहेत. हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर रिलीज होण्याची शक्यता आहे. याचं पोस्ट प्रोसेसिंगचं काम मुंबईमध्ये केलं जाणार आहे. हा सिनेमा मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करण्याची मेकर्सची इच्छा होती. पण लॉकडाऊन पाहता हे शक्य नाही. 

त्यामुळे निर्माते भुषण कुमार यांनी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचं ठरवलं आहे. पण अजून आर्थिक गणित जुळत नसल्याने यावर दोन्ही बाजूंचं एकमत होऊ शकलेलं नाही. हा सिनेमा 80 च्या दशकातील मुंबईविषयी बरच काही सांगून जातो. या सिनेमाचं बहुतेक शुटिंग रिअल लोकेशन्सवर झालं आहे. या सिनेमात जॉनसोबत  इम्रान हाश्मी, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive