By  
on  

करोनामुळे सलमान फार्महाऊसमधूनच करणार ‘बिग बॉस 14’ चं शूट

प्रेक्षकांना आगामी हिंदी बिग बॉसची उत्सुकता लागली आहे. पण या सीझनमध्ये अनेक ट्वीस्ट आणि टर्न दिसून येत आहेत. सलमान आता बिग बॉसच्या घरात दिसून येणार नाहीये. तो आपल्या पनवेलच्या फार्महाऊसमधून वीकेंडचा वार आणि इतर एपिसोड शुट करणार आहे. 

करोनामुळे सलमाननेच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चॅनेलनेही त्याच्या फार्महाऊसवर छोटी टीम पाठवण्याचं ठरवलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पाहता एक स्टुडियो बनवला जाणार आहे. या शोचे रुल्सही वेगळे असणार आहेत. स्पर्धकांसाठी यात एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट बनवलं जाणार आहे. जर स्पर्धकाला करोनाची लागण झाल्यास त्याला त्या एपिसोडचं पेमेंट केलं जाणार नाही. त्यामुळे हा सीझन एरवीच्या सीझनपेक्षा खुप वेगळा असल्याचं समोर येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive