By  
on  

या कारणामुळे ‘हंगामा 2’ शुटिंग सुरु होणार सप्टेंबरमध्ये, प्रियदर्शन यांनी केला खुलासा

हंगामाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रियदर्शन आता दुसरा भाग घेऊन येण्यास तयार आहेत. या सिनेमात शिल्पा शेट्टी कुंद्रा, परेश रावल, मीजान जाफ़री आणि प्रणिता सुभाष हे कलाकार आहेत. याशिवाय पाच बालकलाकारही आहेत. या सिनेमाचं शुटिंग लॉकडाऊनच्या काळात 4 महिने बंद होतं. पण या सिनेमातील 8 आणि 11 वर्षं वय असलेल्या कलाकारांची उंची वाढत आहे.

 

त्यामुळे प्रियदर्शन यांनी अधिक न थांबता शुटिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 सप्टेंबरपासून या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होत आहे. मुलांच्या शरीरात होत असलेल्या बदलामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं प्रियदर्शन यांचं म्हणणं आहे. त्यातही केवळ एकच गाणं या मुलांवर शुट केलं जाणार आहे. यासाठी 15 दिवसांचं शेड्युल आखलं आहे. सर्व टीम शुटिंगसाठी कुलु मनालीला जाणार आहे. या आर्टिस्टमध्ये 18 महिन्याचं बाळही आहे. त्यामुळे पुर्ण खबरदारी घेऊनच हे शुट पुर्ण केलं जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive