By  
on  

सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी केलं ‘प्रवासी रोजगार’ अ‍ॅप लाँच

स्थलांतरित मजूरांसाठी देवदूत बनून आलेल्या अभिनेता सोनू सूदचं आज सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्याच्या कार्याची माहिती तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. सोनू आणि त्याची टीम लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पोहचवण्याची व्यवस्था अहोरात्र केली. तरीही आपल्या कामाची कोणतीही अवास्तव प्रसिद्धी तो करताना दिसत नाही. तो आपसूकच प्रसिध्दी झोतात आला, पण त्याला त्याची हौस नाही.

आता सोनूने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. ‘प्रवासी रोजगार’ या नावाने त्याने अ‍ॅप लाँच केलं आहे. मजुरांना रोजगार शोधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व लिंक्स या अ‍ॅपवर मिळतील.

बांधकाम, कापड व्यवसाय, आरोग्यसेवा, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, ऑटोमोबाइल, ई-कॉमर्स या विविध क्षेत्रांतील ५०० कंपन्यांतील नोकरीच्या संधींची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive