By  
on  

 विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’चं नवं गाणं ‘रानी हिंदुस्तानी’ प्रदर्शित

विद्या बालनचा आगामी सिनेमा शकुंतला देवीचं नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. 'रानी हिन्दुस्तानी' असे या गाण्याचे बोल आहेत. शुकंतला देवी यांचा जादुई सफर यात पाहायला मिळतेय. मानवी कॉम्पुटर म्हणून ओळख असलेल्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. ज्यात विद्या बालन शकुंतला देवी यांच्या भूमिकेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेलं हे गाणं सुनिधि चौहानने गायलं असून सचिन-जिगर या संगीतकार जोडीने याचं संगीत दिलं आहे. तर वायु यांनी हे गीत लिहीलय. शकुंतला याचा प्रेरणादायी प्रवास या सिनेमातून समोर येणार आहे. गणित कौशल्यासोबत त्याच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या सिनेमातून समोर येतील.
 

 अनू मेनन दिग्दर्शत आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रोडक्शन आणि विक्रम मल्होत्रा द्वारा निर्मित शुकंतला देवी सिनेमात विद्या बालतन सोबतच जिशु सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा, अमित साध हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 इतर महत्त्वाच्या सिनेमांप्रमाणे हा सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. येत्या 31 जुलैला अमेझॉन प्राईमवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे 
 

Recommended

PeepingMoon Exclusive