By  
on  

बिग बींनी ट्विट करत सांगितलं, करोना निगेटिव्हची ती खोटी बातमी, जाणून घ्या

सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करोना संकटाशी झुंज देत आहेत. नानावटी हॉस्पीटलमध्ये दाखल होऊन बिग बींना एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. 11 जुलैला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. तेव्हा त्यांना तापसुध्दा होता आणि करोनाची सर्व सौम्य लक्षणं आढळली. तेव्हापासून ते रुग्णालातच आहेत. तिथूनच सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधतात. पण काल २३ जुलै रोजी एका बातमीने संपूर्ण सिनेविश्वात जोरदार चर्चा निर्माण झाली, ती म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण आता बिग बींनीच या वृत्ताची सत्यता सांगितली आहे. 

एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत बिग बींनी ‘ती न्यूज फेक आहे, बनावट आहे’, असं ट्विटरवर स्पष्ट केलं.अशी बेजबाबदार आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल या वृत्ताहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत बिग बींनी स्पष्टिकरण दिलं आहे. 

 

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्यालाही करोनाची लागण झाली आहे. या चौघांवर उपचार सुरू आहेत. “अमिताभ व अभिषेक यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive