By  
on  

‘खतरों के खिलाडी १०’च्या विजेतेपदावर करिश्मा तन्नाने कोरलं नाव

‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा दहावा सिझन नुकताच पार पडला. रविवारी या शोची अंतिम फेरी मुंबईत रंगली. या शोच्या  दहाव्या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री करिश्मा तन्नाने पटकावलं. करण पटेल, बलराज सायल आणि धर्मेश येलांडे यांसारख्या स्पर्धकांवर तिने मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. बक्षीस म्हणून करिश्माला ‘खतरों के खिलाडी’च्या ट्रॉफीसोबतच २० लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोची शूटिंग बल्गेरिया येथे झाली होती. तसंच आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरसुध्दा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive