By  
on  

Shakuntala Devi Review : गणितज्ञ शकुंतला देवीच्या आयुष्याचा फॉर्म्युला आणि आई-मुलीच्या नात्याची जाणीव करुन देणारा सिनेमा

फिल्म: शकुंतला देवी
OTT: अमेझॉन प्राईम व्हिडीओ 
कास्ट: विद्या बालन, सान्या मल्होत्रा, अमित साध, जिस्सू सेनगुप्ता, प्रकाश बेलावादी, इप्शिता चक्रवर्ती सिंह
दिग्दर्शक: अनू मेनन  
रेटिंग : 4 मून्स 

 आश्चर्यकारक विशेष कौशल्य जिच्याकडे आहे अशी महिला जिला ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळखलं जातं. जी लहानपणापासूनच गणितात प्रचंड हुशार होती, ती आहे शकुंतला देवी. जिच्या आयुष्यावर आहे अमेझ़ॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेला ‘शकुंतला देवी’ हा सिनेमा. अभिनेत्री विद्या बालन या सिनेमात शकुंतला देवीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात विद्यासोबतच अभिनेत्री सान्या मल्होत्रा, अमित साध, जिस्सू सेनगुप्ता, प्रकाश बेलावादी, इप्शिता चक्रवर्ती सिंह हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनू मेनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. इशिता मोइत्राने हा सिनेमा आणि डायलॉग लिहीले आहेत. नयनिका महतानी आणि अनू मेननचा स्क्रिनप्ले आहे. अल्फाबेटमुळे जिचा गोंधळ होतो मात्र आकड्यांमुळे नाही, गणित जिचा जिवलग मित्र आहे अशी आहे शकुंतला देवी. गणितासोबतच जिचा सेन्स ऑफ ह्युमरही जबरदस्त आहे. आणि याच शकुंतला देवीची भूमिका विद्या बालनने उत्तम पद्धतिने साकारली आहे. 

सिनेमाची सुरुवात 1934च्या बँगलोरमधील एका गरीब कुटुंबातील छोट्या मुलीच्या कथेने सुरु होते जी आहे शकुंतला. या छोट्या मुलीचं टॅलेंट पाहुन तिचं कुटुंबही चकित होतं. आणि तिच्या याच टॅलेंटचा वापर करून तिचा परिवार घरचा खर्च पुरवतात. यातच या मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात प्रिय व्यक्तिचं निधन होतं. ज्यामुळे ही मुलगी तिच्या आई-वडिलांचा द्वेष करु लागते. पुढे जाऊन मोठी झाल्यावर हीच मुलगी गणितज्ञ आणि ह्युमन कॉम्प्युटरच्या नावाने ओळखली जाते. मात्र यात शकुंतला देवीच्या आयुष्यात कोण कोण येतं ?, तिच तिच्या मुलीसोबतचं नातं कसं असत ? आणि त्यात काय चढउतार येतात ? हे या सिनेमात पाहायला मिळतय. या प्रवासात शकुंतला देवी कशी श्रीमंत होत जाते यात तिला विविध व्यक्ती भेटत जातात मात्र या सगळ्यात गुंतलेली शकुंतलाच्या आयुष्यात नवी पाहुणी म्हणजेच तिची मुलगी जन्म घेते तेव्हा तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे या सिनेमात आहे.

शुकंतला देवीचा गणिततज्ञ कौशल्याचा प्रवास पाहणं मजेशीर वाटतं. विशेष म्हणजे गणितं सोडवण्याचा अंदाज विद्याने उत्तम पद्धतिने साकारला आहे. साडी आणि वेणीचा लुक ते आईचा शॉर्ट हेयर लुक विद्याने सहजरित्या सांभाळला आहे.  या भूमिकेत विद्या खोलवर शिरलेली दिसतेय हे सिनेमा पाहताना जाणवतं.

विद्याने आत्तापर्यंत प्रत्येक सिनेमात तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना इम्प्रेस केलं आहे. आणि या सिनेमातही शकुंतला देवीचं गणिताप्रती असलेलं प्रेम आणि कुटुंबाची जबाबदारी याच्याशी जोडलेली कथा या सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे जो विद्याने सहज मांडला आहे. हेच विद्याच्या अभिनयातील कौशल्य आहे. सिनेमात शकुंतला देवीच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री सान्या मल्होत्रा आहे. सान्याने मुलीची भूमिका उत्तम साकारली आहे. तिचा वेगळा लुकही यात पाहायला मिळतोय. अमित साध हा शकुंतला देवीच्या जावईच्या भूमिकेत प्रभावित करतो. जिस्सू सेनगुप्ता शकुंतला देवीच्या पतिच्या भूमिकेत आहे. जो कमी सीन्समध्ये जरी असला तरी त्याने त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. 

सिनेमातील काही सीन तुम्हाला भावुक करतील तर विनोदी सीन तुम्हाला नक्कीच हसवतील. मात्र याचं श्रेय सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनापासून ते सिनेमॅटोग्राफी आणि विद्या बालनच्या अभिनयापर्यंत सगळ्यांनाचं जातं. 
सिनेमाचे काही सीन धीम्या गतीने पुढे सरकतात ज्यामुळे कदाचीत सिनेमापासून तुमचं लक्ष विचलीत होऊ शकतं. मात्र सोबतच सिनेमाची कथा तुम्हाला सिनेमासोबत शेवटपर्यंत बांधून ठेवतात. सिनेमातील विद्या आणि सान्याची आई-मुलीच्या जोडीतील केमिस्ट्रीही चांगली दिसत आहे. दोघी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच काम करत असल्या तरी ती केमिस्ट्री चांगलीच जुळून आलेली दिसते.सिनेमातील गाण्यांना सचिन- जिगर यांनी संगीत दिलं आहे, तिही ऐकायला आणि पाहायला मजा येते. 

शकुंतला देवीच्या आयुष्यासोबतच या सिनेमात आई आणि मुलीच्या नात्यातली ओलावा, त्यातली गंमत या   पाहायला मिळते. जर तुम्हालाही गणिताची आवड असेल किंवा गणिताची आवड नसेलही तर हा सिनेमा पाहिल्यानंतर कदाचीत तुमचीही गणिताशी मैत्री होईल...

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive