सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या केसची CBI करणार चौकशी

By  
on  

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला 50 दिवस उलटल्यानंतर CBI ला सुशांतच्या केसची चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे सुशांतची केस सीबीआयकडे नेण्यास निश्चयी नव्हते. गृहमंत्री अनील देशमुख यांचाही या चौकशीसाठी नकार होता.
सुशांतच्या परिवाराला आराम देत, केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की बिहार सरकारने सीबीआय चौकशीच्या केलेल्या मागणीला स्विकारण्यात आलय. कोर्टानेही यासंबंधीत विधान केलं आहे की, “भारतीय संघाच्या तत्त्वानुसार बिहार सरकारने केलेल्या सीबीआय चौकशीची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अधिसूचना आज जारी केल्या जातील.” यानुसार सीबीआय गुरुवार एफआयआर रजिस्टर करतील.

सुशांतचे वडिल के.के. सिंह यांनी 28 जुलै 2020 रोजी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चर्कवर्ती आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यांच्यावर कट रचण्याचा आणि आत्महत्येसाठी प्रोत्साहित करण्याचा आरोप करत ही एफआयआर दाखल करण्यात आली होती. यात सुशांतच्या वडिलांनी रया आणि तिच्या परिवारावर सुशांतच्या बँक खात्यामधून पैसे काढले असल्याचा दावा केला होता. सुशांतच्या सिनेमा सोडून शेती करण्याच्या प्लॅनवरही रियाने नुकसान पोहोचवल्याचा त्यांनी या दावा केला होता.  रियाने 8 जूनला सुशांतचं घर सोडताना सुशांतचा लॅपटॉप, दागिने, क्रेडिट कार्ड आणि मेडिकल कागदपत्रे घेऊन गेली असल्याचं सुशांतचे वडिल म्हटल्याचं बोललं जातय.
सुशांतच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओच्या माध्यमातूनही त्यांचं विधान जारी केलं होतं. ज्यात त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलीसांकडे सुशांतचं आयुष्य धोक्यात असल्याची तक्रार दाखल केली असल्याचं म्हटलं आहे. 

Recommended

Loading...
Share