संजय दत्त, आलिया भट, आदित्य रॉय कपूरच्या 'सडक -2' चा ट्रेलर प्रदर्शित, मकरंद देशपांडेचीही महत्त्वाची भूमिका

By  
on  

महेश भट्ट दिग्दर्शित सडक- 2 चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 1991 च्या सडक या सिनेमाचा हा सिक्वल आहे. या सिनेमात संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पूजा भट्ट्, मकरंद देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मुकेश भट्ट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

ट्रेरलची सुरुवात सडक सिनेमातील संजय दत्तच्या सीनपासून होते. ही कहाणी पुढे जात एक वेगळं गुढ या सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहे. रहस्य, बदला आणि प्रेम असलेली या सिनेमाची कहाणी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने संजय दत्त आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसतील. 

डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share