By  
on  

Khuda Haafiz Review : सत्य घटनेवर आधारित कथा त्याचा थरार आणि बदला, विद्युत जामवालने दाखवलं अभिनयकौशल्य

सिनेमा – खुदा हाफिज
कलाकार – विद्युत जामवाल, शिवालिका ओबेरॉय, अनू कपूर, शिव पंडीत, अहाना कुमरा, विपीन शर्मा, नवाब शाह   
दिग्दर्शक/लेखक – फारुक कबीर
ओटीटी – डिस्ने प्लस हॉटस्टार
रेटिंग – 3 मून्स  

खुदा हाफिजाचा अर्थ असा होतो की खुदा तुमचं रक्षण करेल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेला सिनेमा खुदा हाफिजचं फारुक कबीर यांनी दिग्दर्शन केलं असून त्यांनीच हा सिनेमा लिहीला आहे. विद्युत जामवाल, शिवालिका ओबेरॉय, अनू कपूर, शिव पंडीत, अहाना कुमरा, विपीन शर्मा, नवाब शाह हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारित असून 2007 ते 2008 मध्ये आलेल्या आर्थिक संकटाचा काळ या सिनेमात दाखवण्यात आला आहे.    

 

या सिनेमात समीर नावाचा एक सामान्य मुलगा जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एक मुस्लिम मुलगी नरगीससोबत त्याचं लग्न होतं. आनंदात सुरु असलेल्या त्यांच्या आयुष्यात अचानक आर्थिक संकटाच्या काळात दोघांचीही नोकरी जाते. मात्र असं असताना अचानक आशेचा किरण त्यांना दिसतो. नरगीसला एक नवी संधी चालून येते. मात्र या नव्या नोकरीसाठी तिला लोमान या ठिकाणी जावं लागतं. मात्र तिथे गेल्यावर देह व्यापार करणाऱ्या मोठ्या जाळ्यात ती सापडते. लोमानमध्ये अडकलेल्या आपल्या पत्नीला सुरक्षित घर आणण्यासाठी समीर लोमानला जातो. जिथे तिला वाचवण्यासाठी त्याला विविध संकटांना सामोरं जावं लागतं. 
जबरदस्त एक्शनसाठी ओळखल्या जाणारा विद्युत या सिनेमात एक सामान्य माणूस दाखवला आहे जो त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम करतो. विद्युतची एक्शन स्टार अशी ओळख या सिनेमात थोड कमी दिसते.

या सिनेमात विद्युतची आणखी एक्शन पाहायला मिळाली असती तर सिनेमा आणखी खुलला असता. विद्युत ने मात्र या सिनेमाला त्याच्या अभिनयाने त्याच्या भूमिकेला शेवटपर्यंत पकडून ठेवलय. शिवालिकाचा हा दुसरा सिनेमा आहे. मात्र तिची भूमिका इतकी प्रभाव करणारी वाटत नाही. या सगळ्यात समीरला मदत करणारा टॅक्सि ड्रायव्हर जो अनू कपूर यांनी साकारला आहे. त्यांचं कामही प्रशंसनीय आहे. शिव पंडित आणि अहाना कुमराने साकारलेल्या भूमिकांमध्ये अरेबिक भाषेवर चांगली कमान्ड पकडलेली पाहायला मिळतय. अहाना कुमराने सिनेमातील एक्शनही कमाल केली आहे.


 

 अमर मोहिलेचं बॅकग्राउंड स्कोअर आणि मिथून यांचं संगीत सिनेमाची शोभा वाढवतं. सिनेमाचे काही सीन मात्र सैल वाटू लागतात. जे काही ठिकाणी कंटाळवाणेही वाटतात. सिनेमॅटोग्राफी मात्र उत्तम झाली आहे. 
विद्युत जामवालची ओळख ज्या कारणासाठी ओळख आहे ती एक्शन या सिनेमात कमी असल्याने हा सिनेमा थोडी निराशा करतो. 

 
 

Recommended

PeepingMoon Exclusive