By  
on  

उर्मिला मातोंडकरची राज्य सरकारला 20 लाखांची मदत, महाराष्ट्रासाठी पुढे सरसावली उर्मिला

कोरोनाग्रस्त परिस्थिती आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. यातच अनेकांनी राज्य सरकारकडे मदतीचा हात पुढे केला. यात अनेक उद्योगपती, मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी मदतीचा हात पुढे करत महाराष्ट्रासाठी मदत केली. अभिनेता सोन सूदपासून अनेक कलाकार यात मदतीसाठी पुढे सरसावले.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही आता महाराष्ट्रासाठी पुढे सरसावली आहे. उर्मिलाने राज्य सरकारला 20 लाखांची मदत केली आहे. आणि इतरही कलाकारांनी पुढे येऊन राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन ती करते.

एका प्रसिद्ध वेब पोर्टलच्या माहितीनुसार उर्मिला म्हणते की,  "कोरोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. प्रत्येक राज्यात व देशात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास अनेक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे होत आहे. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, पण तेवढंच पाठबळ कोविड योद्ध्यांना देणं गरजेचं आहे. सुरुवातीला सर्वांचे हात पुढे आले. पण, हळूहळू पुर्वपदावर येत असताना सरकारसोबत तिकक्याच ताकदीनं पुढे यायला पाहिजे"

लोकसभा निवडणुक झाली तेव्हा उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण गोपाळ शेट्टींविरोधात लोकसभा निवडणूक लढवताना उर्मिलाचा निवडणुकीत पराभव झाला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive