By  
on  

जेनिलियाने शेअर केला तिचा Covid-19 चा अनुभव, दिला यशस्वी लढा

जगभर विळखा पडलेला करोना आपले हात पाय पसरवतच चालला आहे. सामान्य माणूसच नव्हे तर सेलिब्रिटीही करोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री जेनिलिया देशमुखनेही तिला करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं आहे. 
पण आनंदाची बाब अशी तिचा आयसोलेशन कालावधी पुर्ण झाला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

 

जवळपास 21 दिवसांनी जेनिलिया करोनामुक्त झाली आहे. यावेळी जेनिलियाने पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘तीन आठवड्यांपूर्वी माझा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण गेल्या २१ दिवसांत मला कोणतीच लक्षणं नव्हती. देवाच्या कृपेने आज माझा करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मला ही गोष्ट कबुल करावी लागेल की क्वारंटाइनमध्ये घालवलेले ते २१ दिवस खूप आव्हानात्मक होते. त्या एकटेपणाचा सामना करणं जास्त कठीण गेलं. आता पुन्हा एकदा कुटुंबियांसोबत राहत आहे. शक्य तितक्या लवकर चाचणी करून घेणे आणि पोषक आहार घेणे हाच करोनावर मात करण्याचा उपाय आहे.’ यावेळी चाहत्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive