By  
on  

करण जौहर लाँच करणार पिक्चर बुक , पिक्चर बुकमध्ये असेल पालकत्वाचा अनुभव

दिग्दर्शक निर्माता करण जौहरने लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर त्याची जुडवा मुलं रूही आणि यश जौहरचे व्हिडीओ पोस्ट केले होते. सोशल मिडीयावर हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहिला. या काळात घरात राहून करणने पालकत्व जास्त काळ अनुभवलं. आणि हाच अनुभव करण जौहर आता पुस्तक स्वरुपात समोर आणणार आहे. कारण नुकतच करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याविषीची माहिती दिली आहे. करण त्याच्या मुलांची पिक्चर बुक लाँच करणार असल्याचं त्याने यात म्हटलयं.

या नवीन पुस्तकाविषयी सांगताना करण या पोस्टमध्ये लिहीतो की, “एक खास गोष्ट तुमच्यासोबत शेयर करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझ्या मुलांसाठी माझं पहिलं पिक्चर बुक. लवकरच.”यासोबतच या कामासाठी ट्विंकल खन्नाचेही त्याने आभार मानले आहेत. हे पिक्चर बुक करणच्या पालकत्व अनुभवावर आधारित असेल.

या पुस्तकात मुलगा आणि मुलीच्या पालन पोषणातील करण्यात येणाऱ्या अंतराविषयी सांगेल. करणची ही पोस्टपाहून त्याच्या इतर सिनेसृष्टीतील मित्रमंडळींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा, दिया मिर्जासह अनेक कलाकारांनी पोस्टवर कमेंट्स केल्या आहे. 'बिग थॉट्स ऑफ लिटील लव्ह' असं या पिक्चर बुकचं नाव आहे.

याआधी करणने ऐन अनसुटेबल बॉय हे त्याचं पुस्तक लिहीलं होतं. जे त्याच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्या पुस्तकात करणने त्याच्या आयुष्यातील बरेच रहस्य उघड केले होते. 2017मध्ये करणचं हे पुस्तक आलं होतं.आता त्याच्या मुलांसोबतच्या अनुभवावर आधारित आगामी पुस्तकातही बऱ्याच गोष्टी पाहायला आणि वाचायला मिळतील. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive