By  
on  

करीना कपूर खानने फ्लॉन्ट केला बेबी बंप, तैमूरसह एन्जॉय केली फुटबॉल मॅच

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना खान आणि पती सैफ अली खान यांच्याकडे पुन्हा एकदा गोड बातमी आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीय. करिना पुन्हा आई होणार व तैमूरला नवं भावंडं मिळणार आहे. मागच्याच महिन्यात याबाबतची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मित्र-परिवार व असंख्य चाहत्यांकडून बेबोवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अशातच करिनाने लेक तैमूर सोबतचा एक क्युट फोटो नुकताच शेअर केला आहे. ह्यात करिना आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना खुप खुशीत दिसतेय. 

प्रेग्नेन्सीच्या सुट्ट्यांवर जाण्यापूर्वी तिने तिची सर्व प्रोफेशनल कामं आटपून घेतली आहेत. ती नेहमीच वर्क बॅलन्स सांभाळताना पाहायला मिळते. काल रविवारचा सुट्टीचा दिवस.  ती घरीच मस्त फुटबॉल मॅच एन्जॉय करत होती, तेसुध्दा छोट्या तैमूरसोबत. लाडकी टीम मॅन्चेस्टर युनायटेडसाठी दोघंही छान चिअर करताना यावेळी पाहायला मिळाले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Excuse us... Got to go cheer for our favourite team @mancity @pumaindia

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

 

अलिकडेच एका मुलाखतीत करिनाने काही गोष्टी उलगडल्या, यावेळी प्रेग्नेन्सीदरम्यान आपण तोलून मापूनच खाणार असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. तैमूरच्या वेळेसे तिने तब्बल २५ किलो वजन वाढवलं होतं. त्यामुळे ह्यावेळेस डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच ती आपल्या डाएटवर लक्ष देतेय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive