By  
on  

करीनाला सैफच्या ऑटोबायोग्राफीबाबत वाटते आहे ही भिती

सैफ अलीखानने नुकतीच ऑटोबायोग्राफी लाँच करण्याची घोषणा केली आहे. या पुस्तकात सैफ आयुष्यातील चढ उतार, कुटुंब, अपयश आणि प्रेरणेबाबत लिहेल. पुढील वर्षापर्यंत ही बायोग्राफी भेटीला येईल. पण करीनाला मात्र वेगळीच चिंता सतावते आहे. सैफला करीना सल्ला देताना म्हणते की, मला वाटतं सैफने बायोग्राफीमध्ये अराजकीय विधान करताना खुप काळजीपुर्वक करावं लागेल.

 

कारण त्याचं यातील अज्ञान वादाला निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळेच त्याची बायोग्राफी प्रकाशित करण्यासाठी मी एडिट करणं पसंत करेन. या बायोग्राफीच्या माध्यमातून सैफचे अनेक अनसीन पैलू समोर येतील. करीना सध्या लाल सिंह चढ्ढाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती करण जोहरच्या ‘तख्त’ मध्येही दिसणार आहे. तर सैफ ‘बंटी आणि बबली 2’ मध्ये दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive