By  
on  

मलायकाचा लीक झालेला रिपोर्ट पाहून भडकली अमृता म्हणते, ही सेलिब्रिटी असण्याची किमत?’

काल पीपिंगमूनने तुम्हाला सांगितलं की मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर स्वत: मलायका आणि अर्जुनने याबाबत सोशल मिडियावर शेअर केलं होतं. मलायकाचा कोविड रिपोर्ट अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होताना दिसत आहे. हे पाहून मलायकाची बहीण अमृता चांगलीच भटकली आहे.

अमृता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘ सेलिब्रिटी होण्याची ही किमत आहे? New normal? हे योग्य आहे का? माझ्या बहिणीचे रिझल्ट वेगवेगळ्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि इतर सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत. ती निगेटिव्ह टेस्टसाठी प्रार्थना करत असताना हा प्रकार तिच्यासमोर आला हे ठिक आहे का? 

तिच्या या परिस्थितीवर विनोद करणं हे कितपत योग्य आहे हे ज्याने त्याने ठरवावं.’ यावेळी अमृताने पेशंटच्या प्रायव्हसी पॉलिसीवरही प्रश्न निर्माण केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive