By  
on  

दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं निधन

दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं . ते 74 वर्षांचे होते. आंध्रप्रदेशच्या गुंटुर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयप्रकाश रेड्डी हे तेलुगू सिनेविश्वातील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेते म्हणून प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलियानेही त्यांना ट्विट करत श्रध्दांजली वाहिली आहे. जेनेलियाने दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही काम केलं आहे, त्यामुळे जयप्रकाश रेड्डी यांना श्रध्दांजली वाहताना ती म्हणते, आपण शूटींग करताना किती धम्माल करायचो, किती अविस्मरणीय क्षण होते ते...माझ्या प्रार्थना तुमच्या कुटुंबासोबत आहेत. 

 

जेनेलियासह दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू , राकुलप्रित सिंह, ज्युनियर एनटीआर आदी कलाकारांनी जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ आणि ‘टेंपर’ आदी गाजलेल्या सिनेमात जयप्रकाश यांनी भूमिका साकरल्या होत्या.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive