धकधक गर्ल माधुरीने आशा भोसले यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर तर त्यांची गाणी, त्यांच्यासोबतच्या आठवणी यांना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अनेकांसह धकधक गर्ल माधुरी दीक्षितही आशा भोसले यांची मोठी चाहती आहे. माधुरीनेही आशाताईंना सोशल मिडीयावर पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, "तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके. आशा ताई तुमचा आवाज कायम कायम माझ्या हदयाला भावतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा."

माधुरीसह आशा भोसले यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share